Sajan daari ubha…

I had written this a long time ago, after hearing Arya Ambekar sing the song (which is reproduced at the end)…I had heard the poem recited by Bharati Achrekar in Nakshatranche Dene (special episode) and it’s words captured my heart…But hearing the song, was mesmerising, transporting you to another world. It refused to leave me till I wrote this down.

पिया येणार म्हणजे कधीचीच हुरहुर लागलेली अस्ते… तो आल्यावर आपली भेट कशी बरं होईल ? हे स्वप्न डोळे उघडेच ठेवून पाहिलेले असते … तो आपल्याला ओळखेल का? आपल्याकडे पाहून हसेल का? मग आपण काय करू? दार उघडू ? की त्याच भानच राहणार नाही? नुसताच लाजू कि हळूच हसू? त्याने आपल्याला लगेच मिठीत घेतला तर… असेच बरेचसे विचार करत पिया येणार म्हणजे “सेन्दुरी से मांग अपनी सजी …रुप सैया के कारण सजाया ” ही अवस्था झालेली असते …असे पिया जिया मध्ये सामावलेले असतात

पण जर कधी अनपेक्षित पणे साजण दारी उभा ठाकला तर? कसली धांदल उडते!! आता काय करावे? त्याला कसे सामोरे जावे? अजून तरी काहीच साज शृंगार झालेला नाही. छे अजून केस विंचरले नाहींत… न्हायले नाही … काजळ तर दूरच …

पण हा “साजण” असाच अनपेक्षित येतो … त्या करता ना “अंगण” तयार असते न “साजणी”… हया देहाचे अंगण आणि आत्म्याची साजणी ह्यांची कधीच तयारी झालेली नसते … “साजण” पण असा हुश्शार की नेमकी आपली परीक्षाच घ्यायला आतूर … असं म्हणतात “त्याला” पाहायला एक दिव्य दृष्टी लागते. आत्म्याला हे माहित असतं पण अजून ही देह बाहेरचा शृंगारात मग्न असतो. त्या दिव्य दृष्टीचे अंजण डोळ्यात पडलेले नसते

हा क्षणिक मिळालेला दुबळा देह आपण गोंजारत बसतो , दुःखे कवटाळून बसून राहतो … जे प्राण त्या “सख्या”वर ओवाळून टाकायचे, ते ह्या भौतिक जगातच अडकून पडलेले असतात … स्वतःला अजून ओळखला नसतं, निरखलं नसतं … आता देह रुपी अंगणा पलीकडे जाऊन साजणाला भेटायचा असतं खरं पण मन मात्र मागे ह्या शाश्वत जगा कडे वळून वळून पहाता …

साजण परत दार ठोठावतो … परत आपण भानावर येतो … अरे हीच साद तो कित्येक जन्मापासून आपल्याला घालतोय … आपण ऐकून न ऐकल्या सारखे करतोय … तो आपला प्रियकर आहे , राधेचा कान्हा आहे, मीरेचा गिरीधर गोपाल आहे … आपण त्याची राधिका आहोत … आणि “तो” आणि “मी” काही वेगळे नाहीत … मग माझी मलाच मी कशी मिठी मारू … हृदय माझे कसे मीच हृदयी धरू … घर कधी आवरू … मज कधी सावरू?
सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी;
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ?मी न दुबळी कुडी अजुन शृंगारिली
मी न सगळीच ही आसवे माळिली,
प्राणपूजा न मी अजुनही बांधिली;
काय दारातुनी परत मागे फिरू ?बघ पुन्हा वाजली थाप दारावरी :
हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;
तीच मी राधिका ! तोच हा श्रीहरी !
हृदय माझे कसे मीच हृदयी धरू ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s